Taste the real Alphono Mango SHOP NOW

हापूस आंबा - फळांचा राजा

By Prashant Powle  •  0 comments  •   3 minute read

हापूस आंबा - फळांचा राजा - AlphonsoMango.in

हापूस आंबा - फळांचा राजा

हापूस आंबा हा फळांचं राजा आहे. त्याचे नाव काढताच लहान मोठ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्याचे कारण तसेच आहे.

आंबा ह्या फळाची चव अवीट आणि मधुर आहे. आंबा ह्या फळाची चव इतर फळांपेक्षा अप्रतिम आहे आणि त्याचे गुण इतर फळांपेक्षा वैशिष्ट्य पूर्ण आहेत म्हणून त्याला फळांचा राजा म्हणले जाते त्यामुळेच त्याला राष्ट्रीय फळाचा दर्जा दिला आहे.

आंब्याला संस्कृत मध्ये आम्र असे म्हणतात.

आंब्याची आगमनाची चाहूल आंब्याच्या झाडाला मोहोर आल्यावर समजते. त्या मोहोराचा सुद्धा एक मंद असा सुवास असतो.

ह्या फळाच्या आगमनाची वर्दी पक्षी सुद्धा देतात.

कोकीळ हा पक्षी त्यावेळेस कुहू कुहू करून गाणी म्हणत असतो हे फळ जेव्हा कच्चे असते तेव्हा त्याला कैरी म्हणून ओळखतात. त्याचे सुद्धा विविध उपयोग आहेत. 

रत्नागिरी हापूस आंब्याची वेग वेगळी नावं

रत्नागिरी आंबा, रत्नागिरी मँगो, रत्नागिरी अल्फोन्सो मँगो, हापूस आंबा रत्नागिरी, रत्नागिरी अल्फोन्सो आंबा

देवगड हापूस आंब्याची वेग वेगळी नावं

देवगड आंबा, देवगड मँगो, देवगड अल्फोन्सो मँगो, देवगड अल्फोन्सो आंबा, हापूस आंबा देवगड

हापूस आंब्याची पदार्थ

 कैरी पासून मुरंबा जाम, जेली, चॉकलेट्स, पन्हे, लोणचे, सरबत बनवतात तसेच जेवणात विविध भाज्या व माश्याचे सार ह्या मध्ये कैरी घातली जाते त्यामुळे त्या जेवणाची लज्जत वाढते. कैरी मुळे आजारी माणसाच्या तोंडाला चव येते. हि कैरी जेव्हा पिकली जाते तेव्हा त्याला आंबा म्हणतात. 

आंब्याच्या अनेक जाती आहेत. त्याचे वैशिष्ट्य असे कि प्रत्येक प्रांतात त्याची चव रंग रूप ह्यात वेगळे पणा असतो. दक्षिण भारत, उत्तर भारत, पश्चिम भारत, प्रत्येक मातीमध्ये निसर्गाने त्याला चवीचे आणि आकाराचे वेगळे वरदान दिले आहे.

आंब्याचा रंग हा मोहक पिवळा परंतु वेगवेगळ्या आंब्याच्या जाती प्रमाणे त्याच्या रंग छटा बदलतात. 

तोतापुरी, नीलम, दशहरी, पायरी, रायवळ, लंगडा, रूमानिया, हापूस, बाल्साल्ड आंबा, अश्या एकूण १३०० पेक्षा जास्त जाती आहेत. सर्वात लोकप्रिय आंब्याची जात आहे ती म्हणजे हापूस.

कोकणातील हापूरस आंब्याची चव हि अतिशय अप्रतिम असते. हापूस आंबा कोकणच्या मातीतील उत्पादन आहे. कोकणातील हापूस आंबा म्हणजे निसर्गाची किमया होय. 

त्याच्या चवीने अख्या जगाला वेड लावले आहे. त्याची चव इतर कोणत्याही आंब्याच्या फळाला येत नाही. कोकणाखेरीज जरी इतर कुठेही ह्या फळाची लागवड केली तरीही ह्याच्या सारखी चव नाही म्हणून तर ह्याला कोंकण चा राजा म्हणून ओळखतात. असे म्हणतात कि आंबा हा अक्षय तृतीया पासून खायला सुरवात करतात. 

कोकणातील हापूस आंबा हा आजमितीस सात समुद पार पोहचला आहे. हापूस आंब्याला आखाती देश, पश्चिमेकडील देश येथे प्रचंड मागणी आहे.

आणि ह्या आंब्या मुळे देशाचे परकीय चलन सुद्धा वाढण्यास मदत होते. आंबा ह्या फळांमुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे.

कारण ह्या फळाची लागवड ग्रामीण भागात एक उपजीविकेचे साधन आहे. 

आंब्या मुळे गृह उद्योग मोठ्या प्रमाणात केला जातो. आंबा ह्या फळापासून आमरस, जाम, मँगो मिल्क शेक, आईसक्रीम, आंबा पोळी, आंबा बर्फी, वडी बनवली जाते. हे सर्व उद्योग जिथे आंब्याचे उत्पन्ने मिळते तिथे केले जातात आणि त्याद्वारे अनेकांना रोजगार मिळतो.

आमरस पुरी हा तर अत्यंत लोकप्रिय भोजनाचा प्रकार आहे. 

संपूर्ण भारतात तो चवीने खाल्ला जातो. तसेच आंब्याच्या हंगामात आमरस पुरी ने एक प्रकार भारतीय मेजवानीत मानाचे स्थान पटकावले आहे,

आंब्या मध्ये अनेक गुणधर्म आहेत. त्यात प्रतिकार शक्ती वाढवण्याचा गुणधर्म आहे.

तसेच आंबा हा शक्तिवर्धक आहे. आंब्यात अ आणि क जीवनसत्व आहे. तसेच आंबा त्वचा आणि नेत्र विकार उपयोगी आहे.

आंब्याच्या झाडांची पाने सुद्धा औषधी आहेत.

हापूस आंबा 

काही सणांना आंब्याच्या पानांचे तोरण झेंडू फुलांमध्ये ओवून घराच्या मुख्य दरवाज्याला लावतात. आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात आवर्जून केला जातो.

तसेच आंब्याच्या झाडांचे लाकूड सुद्धा फर्निचर साठी वापरतात.

असा हा आंबा आणि त्याचे डेरेदार झाड अनेकांना सावली देते व अनेक पक्ष्यांना घरटे म्हणून आधार देते.

हापूस आंबा कसा ओळखावा

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, आणि पालघर ह्या पाच जिल्ह्यातल्या आंब्यालाच ह्यापुढे हापूस आंबा असे नाव लावता येणार आहे.

हे साध्य झाला आहे भौगोलिक मानांकन ह्या भारत सरकारच्या पेटंट विभागाने दिला आहे.

हापूस आंबा किंमत

खऱ्या हापूस आंब्याची किंमत नेहमी जास्त असते कर्नाटक हापूस आंब्याची किंमत ही नेहमी स्वस्त असते पण चवीत खूप खराब असते.

हापूस आंब्याची वैशिष्ठ

हापूस आंब्याचा आकार हा विशिषष्ठ असतो त्याला कुठे ही चोच किंवा टोक नसते, हापूस हा कधी लांबट नसतो तो जरा गोलसर लांबट असतो.

आंब्याची साल म्हणजे स्किन हे प्लेन असते ते कुठे ही खडबडीत नसते, सालीवर पांढऱ्या फुल्यांच्या लहान छिद्र असतात पातळ साल असता, नाममात्र फायबर असता.   

खरोखर आंबा हे फळ अमृततुल्य फळ आहे यात काही शंका नाही.

 हापूस आंब्याचे पदार्थ बनवण्याचे रेसिपी , आंबा रेसिपी 

Reference and written by Krutika Pitale

Previous Next