हापूस आंबा - फळांचा राजा
हापूस (अल्फोंसो) आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे, जे त्याच्या अतुलनीय गोडव्या आणि सुगंधासाठी ओळखले जाते. पाच कोकण जिल्ह्यांमध्ये (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर) भौगोलिक मानांकन (GI) प्राप्त असलेला हा आंबा उच्च दरासाठी आणि जागतिक निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.
हापूस आंबा हा फळांचा राजा आहे. त्याचे नाव काढताच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. त्याचे कारणही तसेच आहे.
आंबा या फळाची चव अवीट आणि मधुर आहे. आंबा या फळाची चव इतर फळांपेक्षा अप्रतिम आहे आणि त्याचे गुणधर्म इतर फळांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहेत, म्हणून त्याला फळांचा राजा म्हटले जाते आणि म्हणूनच त्याला राष्ट्रीय फळाचा दर्जा दिला आहे.
आंबा हापूस
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांतील आंब्यालाच आता हापूस आंबा असे नाव लावता येणार आहे. हे भारत सरकारच्या पेटंट विभागाने दिलेल्या भौगोलिक मानांकनामुळे साध्य झाले आहे.
आंब्याला संस्कृतमध्ये आम्र असे म्हणतात.
आंब्याचे आगमन झाडाला मोहोर आल्यावर समजते. त्या मोहोराचा सुद्धा एक मंद असा सुवास असतो.
या फळाच्या आगमनाची वर्दी पक्षी सुद्धा देतात.
कोकीळ पक्षी त्यावेळी कुहू-कुहू करून गाणी गात असतो. हे फळ जेव्हा कच्चे असते तेव्हा त्याला कैरी म्हणून ओळखतात. त्याचे सुद्धा विविध उपयोग आहेत.
रत्नागिरी हापूस आंब्याची वेगवेगळी नावे
रत्नागिरी आंबा, रत्नागिरी मँगो, रत्नागिरी अल्फोन्सो मँगो, हापूस आंबा रत्नागिरी, रत्नागिरी अल्फोन्सो आंबा
देवगड हापूस आंब्याची वेगवेगळी नावे
देवगड आंबा, देवगड मँगो, देवगड अल्फोन्सो मँगो, देवगड अल्फोन्सो आंबा, हापूस आंबा देवगड
हापूस आंब्याचे पदार्थ
कैरीपासून मुरंबा, जाम, जेली, चॉकलेट्स, पन्हे, लोणचे, सरबत बनवले जाते. तसेच जेवणात विविध भाज्या आणि माशांच्या रश्श्यामध्ये कैरी घातली जाते, ज्यामुळे जेवणाची लज्जत वाढते. कैरीमुळे आजारी माणसाच्या तोंडाला चव येते. ही कैरी जेव्हा पिकते तेव्हा त्याला आंबा म्हणतात.
आंब्याच्या अनेक जाती आहेत. त्याचे वैशिष्ट्य असे की प्रत्येक प्रांतात त्याची चव, रंग, रूप यामध्ये वेगळेपण असते. दक्षिण भारत, उत्तर भारत, पश्चिम भारत, प्रत्येक मातीमध्ये निसर्गाने त्याला चवीचे आणि आकाराचे वेगळे वरदान दिले आहे.
आंब्याचा रंग मोहक पिवळा असतो, परंतु वेगवेगळ्या जातींप्रमाणे त्याच्या रंगछटा बदलतात.
तोतापुरी, नीलम, दशहरी, पायरी, रायवळ, लंगडा, रूमानिया, हापूस, बाल्साल्ड आंबा, अशा एकूण १३०० पेक्षा जास्त जाती आहेत. सर्वात लोकप्रिय आंब्याची जात म्हणजे हापूस.
कोकणातील हापूस आंब्याची चव अतिशय अप्रतिम असते. हापूस आंबा कोकणच्या मातीतील उत्पादन आहे. कोकणातील हापूस आंबा म्हणजे निसर्गाची किमया होय.
त्याच्या चवीने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. त्याची चव इतर कोणत्याही आंब्याला येत नाही. कोकणाखेरीज जरी इतर कुठेही या फळाची लागवड केली तरीही यासारखी चव मिळत नाही, म्हणूनच याला कोकणचा राजा म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात की अक्षय तृतीयेपासून आंबा खायला सुरुवात करतात.
कोकणातील हापूस आंबा आज सात समुद्र पार पोहोचला आहे. हापूस आंब्याला आखाती देश, पाश्चिमात्य देशांमध्ये प्रचंड मागणी आहे.
या आंब्यामुळे देशाच्या परकीय चलनात वाढ होण्यास मदत होते. आंबा या फळांमुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे.
कारण या फळाची लागवड ग्रामीण भागात उपजीविकेचे साधन आहे.
आंब्यामुळे गृहउद्योग मोठ्या प्रमाणात चालतात. आंबा या फळापासून आमरस, जाम, मँगो मिल्क शेक, आईस्क्रीम, आंबा पोळी, आंबा बर्फी, वडी बनवली जाते. हे सर्व उद्योग जिथे आंब्याचे उत्पन्न मिळते तिथे केले जातात आणि त्याद्वारे अनेकांना रोजगार मिळतो.
आमरस-पुरी हा अत्यंत लोकप्रिय भोजनाचा प्रकार आहे.
संपूर्ण भारतात तो चवीने खाल्ला जातो. तसेच आंब्याच्या हंगामात आमरस-पुरीने भारतीय मेजवानीत मानाचे स्थान पटकावले आहे.
आंब्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. त्यात प्रतिकारशक्ती वाढवण्याचा गुणधर्म आहे.
तसेच आंबा शक्तिवर्धक आहे. आंब्यात अ आणि क जीवनसत्त्वे असतात. तसेच आंबा त्वचा आणि नेत्रविकारांवर उपयुक्त आहे.
आंब्याच्या झाडाची पाने सुद्धा औषधी आहेत.
हापूस आंबा
काही सणांना आंब्याच्या पानांचे तोरण झेंडूच्या फुलांमध्ये ओवून घराच्या मुख्य दरवाजाला लावले जाते. आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात आवर्जून केला जातो.
तसेच आंब्याच्या झाडाचे लाकूड सुद्धा फर्निचरसाठी वापरतात.
असा हा आंबा आणि त्याचे डेरेदार झाड अनेकांना सावली देते व अनेक पक्ष्यांना घरटे म्हणून आधार देते.
हापूस आंबा कसा ओळखावा
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांतील आंब्यालाच आता हापूस आंबा असे नाव लावता येणार आहे.
हे भारत सरकारच्या पेटंट विभागाने दिलेल्या भौगोलिक मानांकनामुळे साध्य झाले आहे.
हापूस आंबा किंमत
खऱ्या हापूस आंब्याची किंमत नेहमी जास्त असते. कर्नाटक हापूस आंब्याची किंमत नेहमी स्वस्त असते, पण चवीत तो निकृष्ट असतो.
हापूस आंब्याची वैशिष्ट्ये
हापूस आंब्याचा आकार वैशिष्ट्यपूर्ण असतो, त्याला कुठेही चोच किंवा टोक नसते. हापूस आंबा कधीही लांबट नसतो, तो थोडा गोलसर-लांबट असतो.
आंब्याची साल (Skin) प्लेन असते, ती कुठेही खडबडीत नसते. सालीवर पांढऱ्या ठिपक्यांची लहान छिद्रे असतात. साल पातळ असते आणि नाममात्र फायबर (तंतू) असतात.
खरोखर, आंबा हे अमृततुल्य फळ आहे, यात काहीही शंका नाही.
हापूस आंब्याचे पदार्थ बनवण्याची रेसिपी, आंबा रेसिपी
संदर्भ आणि लेखन: कृतिका पिताळे
रत्नागिरीस्थित 'पावळे होम फूड्स', हे एक GI अधिकृत वापरकर्ते (AU/5974/GI/139/260) असून, २०१९ पासून कोकणातील संरक्षित क्षेत्रांमधील ४८ गावांतून हापूस आंब्यांची खरेदी करतात.