हापुस आंबा - फळांचा राजा
हापुस (अल्फान्सो) आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे, जे त्याच्या अतुलनीय गोडव्या आणि सुगंधासाठी ओळखले जाते. कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर) भौगोलिक मानांकन (GI) प्राप्त असलेला हा आंबा प्रीमियम दराने विकला जातो आणि जगभरात निर्यात केला जातो.
हापुस आंबा हा फळांचा राजा आहे. त्याचे नाव काढताच लहान-थोर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते, आणि याचे कारणही तसेच आहे.
आंब्याची चव अवीट आणि मधुर आहे. आंब्याची चव इतर फळांपेक्षा अप्रतिम आहे आणि त्याचे गुणधर्म वैशिष्ट्यपूर्ण आहेत, म्हणूनच त्याला 'फळांचा राजा' म्हटले जाते आणि याच कारणामुळे त्याला राष्ट्रीय फळाचा दर्जा देण्यात आला आहे.
आंबा हापुस
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांतील आंब्यालाच यापुढे 'हापुस आंबा' असे नाव लावता येईल. हे भौगोलिक मानांकन (GI Tag) भारत सरकारच्या पेटंट विभागाने दिले आहे.
आंब्याला संस्कृतमध्ये 'आम्र' असे म्हणतात.
आंब्याच्या आगमनाची चाहूल झाडाला मोहोर आल्यावर लागते. त्या मोहोराचाही एक मंद सुवास असतो.
या फळाच्या आगमनाची वर्दी पक्षीही देतात.
कोकिळा पक्षी त्या वेळी 'कुहू-कुहू' करत गाणी गात असतो. हे फळ जेव्हा कच्चे असते, तेव्हा त्याला 'कैरी' म्हणून ओळखले जाते. तिचेही विविध उपयोग आहेत.
रत्नागिरी हापुस आंब्याची विविध नावे
रत्नागिरी आंबा, रत्नागिरी मँगो, रत्नागिरी अल्फोन्सो मँगो, हापुस आंबा रत्नागिरी, रत्नागिरी अल्फोन्सो आंबा
देवगड हापुस आंब्याची विविध नावे
देवगड आंबा, देवगड मँगो, देवगड अल्फोन्सो मँगो, देवगड अल्फोन्सो आंबा, हापुस आंबा देवगड
हापुस आंब्याचे पदार्थ
कैरीपासून मुरंबा, जाम, जेली, चॉकलेट्स, पन्हे, लोणचे, सरबत बनवले जाते; तसेच जेवणात विविध भाज्या व माशांच्या आमटीमध्ये कैरी घातली जाते, ज्यामुळे जेवणाची लज्जत वाढते. कैरीमुळे आजारी माणसाची चव सुधारते. ही कैरी जेव्हा पिकते, तेव्हा त्याला 'आंबा' म्हणतात.
आंब्याच्या अनेक जाती आहेत. त्याचे वैशिष्ट्य असे की, प्रत्येक प्रांतात त्याची चव, रंग आणि रूप यामध्ये वेगळेपणा असतो. दक्षिण भारत, उत्तर भारत, पश्चिम भारत, प्रत्येक मातीमध्ये निसर्गाने त्याला चवीचे आणि आकाराचे वेगळे वरदान दिले आहे.
आंब्याचा रंग मोहक पिवळा असतो, परंतु आंब्याच्या विविध जातींनुसार त्याच्या रंगछटा बदलतात.
तोतापुरी, नीलम, दशहरी, पायरी, रायवळ, लंगडा, रूमानिया, हापुस, बाल्साल्ड आंबा, अशा एकूण १३०० पेक्षा जास्त जाती आहेत. सर्वात लोकप्रिय आंब्याची जात म्हणजे 'हापुस'.
कोकणातील हापुस आंब्याची चव अत्यंत अप्रतिम असते. हापुस आंबा कोकणच्या मातीतील उत्पादन आहे. कोकणातील हापुस आंबा म्हणजे निसर्गाची किमया आहे.
त्याच्या चवीने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. त्याची चव इतर कोणत्याही आंब्याला येत नाही. कोकणाव्यतिरिक्त जरी इतर कुठेही या फळाची लागवड केली, तरी त्याला यासारखी चव येत नाही, म्हणूनच याला 'कोकणचा राजा' म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात की, अक्षय तृतीयेपासून आंबा खायला सुरुवात केली जाते.
कोकणातील हापुस आंबा आज सात समुद्र पार पोहोचला आहे. हापुस आंब्याला आखाती आणि पाश्चात्य देशांमध्ये प्रचंड मागणी आहे.
या आंब्यामुळे देशाचे परकीय चलन वाढण्यासही मदत होते. आंबा या फळामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे.
कारण, या फळाची लागवड ग्रामीण भागात उपजीविकेचे एक साधन आहे.
आंब्यामुळे गृह उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतात. आंबा या फळापासून आमरस, जाम, मँगो मिल्क शेक, आईस्क्रीम, आंबा पोळी, आंबा बर्फी, वडी बनवली जाते. हे सर्व उद्योग जिथे आंबा पिकतो तिथे केले जातात आणि त्याद्वारे अनेकांना रोजगार मिळतो.
आमरस-पुरी हा तर अत्यंत लोकप्रिय भोजनाचा प्रकार आहे.
संपूर्ण भारतात तो आवडीने खाल्ला जातो. तसेच, आंब्याच्या हंगामात आमरस-पुरीने भारतीय मेजवानीत मानाचे स्थान पटकावले आहे.
आंब्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. त्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा गुणधर्म आहे.
तसेच आंबा शक्तिवर्धक आहे. आंब्यात 'अ' आणि 'क' जीवनसत्त्वे असतात. तसेच आंबा त्वचा आणि डोळ्यांच्या विकारांसाठी उपयुक्त आहे.
आंब्याच्या झाडाची पाने सुद्धा औषधी आहेत.
हापुस आंबा
काही सणांना आंब्याच्या पानांचे तोरण झेंडूच्या फुलांत ओवून घराच्या मुख्य दरवाजाला लावले जाते. आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात आवर्जून केला जातो.
तसेच आंब्याच्या झाडाचे लाकूड फर्निचरसाठी वापरतात.
असा हा आंबा आणि त्याचे डेरेदार झाड अनेकांना सावली देते व अनेक पक्ष्यांना घरटे म्हणून आधार देते.
हापुस आंबा कसा ओळखावा
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांतील आंब्यालाच यापुढे 'हापुस आंबा' असे नाव लावता येईल.
हे भौगोलिक मानांकन भारत सरकारच्या पेटंट विभागाने दिले आहे.
हापुस आंब्याची किंमत
खऱ्या हापुस आंब्याची किंमत नेहमी जास्त असते. कर्नाटक हापुस आंब्याची किंमत नेहमी कमी असते, पण चवीच्या बाबतीत तो खूप खराब असतो.
हापुस आंब्याची वैशिष्ट्ये
हापुस आंब्याचा आकार विशिष्ट असतो, त्याला कुठेही चोच किंवा टोक नसते. हापुस आंबा लांबट नसून तो थोडा गोलसर-लांबट असतो.
आंब्याची साल (skin) गुळगुळीत असते, ती कुठेही खडबडीत नसते. सालीवर पांढऱ्या ठिपक्यांची लहान छिद्रे असतात, साल पातळ असते आणि त्यामध्ये फायबर (तंतू) नाममात्र असतात.
खरोखर, आंबा हे फळ अमृततुल्य आहे, यात काही शंका नाही.
हापुस आंब्याचे पदार्थ बनवण्याची रेसिपी, आंबा रेसिपी
संदर्भ आणि लेखन: कृतिका पिताळे
पावळे होम फूड्स, एक GI अधिकृत वापरकर्ता (AU/5974/GI/139/260), रत्नागिरी स्थित असून, २०१९ पासून कोकणच्या संरक्षित क्षेत्रातील ४८ गावांमधून हापुस आंबे मिळवते.